नियम

माझे ३ नियम

अपडेट: १२ ऑक्टोबर २०२६ · माझा अनुभव, सल्ला नाही

लोक विचारतात, डाएट काय करता? डाएट काहीच नाही. गेल्या ३ वर्षांपासून फक्त हे ३ नियम.

१. तळलेलं नाही

वडा, भजी, समोसा बंद. पराठा पण तव्यावर भाजलेलाच.

तेल बंद नाही. फक्त तेलात बुडवून तळलेलं बंद. घरच्या जेवणात तेल लागतंच.

२. साखरयुक्त पदार्थ नाहीत

मिठाई बंद, सणाला पण. चहा घेतच नाही, कॉफी बिनसाखरेची. चहाचा हिशेब इथे आहे.

३. प्रत्येक जेवणात प्रोटीन

अंडी, मटकी उसळ, दही, पनीर. जिमनंतर नाश्त्याला १ स्कूप whey. बाकी सगळं घरचं.

माझी सकाळ

रोज सकाळी हेच, गेली ३ वर्षं:

  1. उठल्यावर आधी वजन.
  2. एक ग्लास कोमट पाणी.
  3. ब्लॅक कॉफी, साखर नाही.
  4. केळं, संत्रं, बदाम किंवा खजूर, यातलं कोणतंही एक.
  5. मग जिम.

यात खास असं काहीच नाही. पण हे रोज करतो. बदल यातूनच झाला.

एक साधा दिवस

रोज अगदी हेच खातो असं नाही. पदार्थ बदलतात, पण नियम तेच.

वेळकाय
नाश्ताकधी प्रोटीन ओट्स, कधी पोहे, सोबत प्रोटीन
दुपार / रात्रघरचं जेवण, त्यात अंडी, उसळ, दही किंवा पनीर
संध्याकाळीकधी फुटाणे, कधी शेंगदाणे, सोबत एखादं फळ

मला कुठली डाएट लिस्ट पाठवता येत नाही, कारण माझ्याकडे ती नाहीच. हा माझा साधा दिवस आहे.

तुम्हाला यातला कोणता नियम सगळ्यात अवघड वाटतो? Instagram वर कमेंटमध्ये सांगा.

मी डायटिशियन नाही. हे माझे स्वतःचे अनुभव आणि हिशेब आहेत. कॅलरी आणि प्रोटीनचे आकडे ढोबळ आहेत आणि पॅकनुसार बदलतात. आजार किंवा औषधे असतील तर आहार बदलण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.