मराठी फिटनेस · बिझी लोकांसाठी
डाएट नको,
लाइफस्टाइल बदला.
ड्युटी, बंदोबस्त, अनियमित वेळा. तरीही ३ वर्षे जिम टिकली. घरचं जेवण, प्रत्येक जेवणात प्रोटीन, गोड आणि तळलेलं बंद. माझे नियम आणि माझे हिशेब इथे आहेत.
तीन नियम
सविस्तर →गेली ३ वर्षं हेच. नियम साधे आहेत, फक्त रोज पाळायचे.
तळलेलं नाही
वडा, भजी, समोसा बंद. तेल बंद नाही, फक्त तेलात बुडवलेलं बंद.
साखर नाही
मिठाई बंद, सणाला पण. चहा नाही, कॉफी साखरेशिवाय.
प्रत्येक जेवणात प्रोटीन
अंडी, उसळ, दही, पनीर. जिमनंतर नाश्त्याला १ स्कूप whey.
वाचा
इन्स्टावर लोकांनी विचारलेल्या गोष्टी, जरा सविस्तर आणि आकड्यांसह.
चहा सोडला, किती कॅलरी वाचल्या?
रोज ४ कप चहावरून २ कप ब्लॅक कॉफी. तुमचा हिशेब स्वतः करून बघा.
वाचा → बंदोबस्तबाहेरगावी असताना प्रोटीन कसं घ्यायचं
बॅगेत काय ठेवतो, हॉटेलात काय मागवतो आणि बजेट कमी असेल तर काय.
वाचा → घरचं जेवणचपाती आणि भात न सोडता थाळी बदला
४ छोटे बदल आणि माझा साधारण आठवडा.
वाचा → माझी गोष्टडाएट टिकला नाही, सवय टिकली
२०१५ पासून २०२३ पर्यंतचा खरा प्रवास, चुकांसकट.
वाचा →चालू प्रवास
मिनी-कट: ६–८ आठवडे, सगळं नोंदवत
चरबी कमी करण्याचा माझा पुढचा टप्पा. रोजचे आकडे खरे सांगतो, चांगले आणि वाईट दोन्ही.
*एका दिवसात इतका बदल चरबी कमी होण्याचा पुरावा नाही. टेप कुठे लावला आणि पाणी यांमुळे फरक पडतो. आठवड्याची सरासरी बघतो.
प्रवास बघाLiftOn app
माझं स्वतःचं gym tracker app. वर्कआउट नोंदी, प्लॅन आणि प्रगती एका जागी. हे app माझं आहे, त्यामुळे इथे हे स्पष्ट सांगतो.